पुणे शहर पोलीस कादीर शेख याच्यावर महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंद !
पुणे – शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी कादीर शेख, समीर पटेल आणि २ अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याविषयी मुंढवा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याविषयी २४ वर्षीय महिलेने तक्रार प्रविष्ट केली आहे. सदर महिला अनुसूचित जाती-जमातीतील असून ३ वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. आरोपी शेख याने पीडित महिलेशी ओळख वाढवून, लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. महिलेने लग्नाविषयी विचारणा केल्यानंतर तिला शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केली असल्याचे समोर येत आहे. हा प्रकार अंदाजे ३ वर्षांपासून १ जुलै या दिवसापर्यंत चालू होता.
संपादकीय भूमिकाधर्मांध पोलिसांचे वर्तन सर्वच स्तरांवर कसे आहे ? हे वरिष्ठांनी बघणे अत्यंत आवश्यक ! धर्मांध कुठेही असले, तरी ते महिलांवर अत्याचार करण्यात आघाडीवर असतात, हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे ! |