प्रशासनाला केवळ आंदोलनाची भाषा समजते का ?

‘सावंतवाडी येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयातील रक्‍तपेढीतील तंत्रज्ञांची (टेक्निशियनची) पदे रिक्‍त असल्‍यामुळे केवळ २ तंत्रज्ञ कार्यरत आहेत. त्‍यातील १ जण सुट्टीवर गेल्‍यामुळे एकावरच कामाचा भार येत आहे. येथील रिक्‍त पदांच्‍या समस्‍येकडे प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आले. त्‍यामुळे २६ जून २०२३ पर्यंत किमान एक तंत्रज्ञ येथे नियुक्‍त न केल्‍यास सावंतवाडी उपजिल्‍हा रुग्‍णालयासमोर काळ्‍या फिती बांधून आंदोलन करण्‍यात येईल’, अशी चेतावणी युवा रक्‍तदाता संघटनेचे अध्‍यक्ष देव्‍या सूर्याजी यांनी दिली आहे.’ (२४.६.२०२३)