सनातनची ग्रंथमालिका : अमृतमय गुरुगाथा
लेखिका डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा उलगडलेला जीवनपट अन् अनुभवलेली गुरुकृपा !
संकलक : डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले
अन्य प्रकाशन – ‘डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या संतभेटी आणि तीर्थयात्रा (खंड ५)’
डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या आध्यात्मिक जीवनाचा आरंभ आणित्यांना झालेली गुरुप्राप्ती (खंड १)
डॉ. (सौ.) कुंदा आठवले (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पत्नी) यांच्या आध्यात्मिक वाटचालीचा आरंभ आणि त्यासंदर्भात प.पू. मलंगशहा बाबा, प.पू. अण्णा करंदीकर, प.पू. धांडेशास्त्री, प.पू. नाना महाराज तराणेकर इत्यादी संतांशी झालेल्या भेटींचे वर्णन दिले आहे. लेखिकेला प.पू. भक्तराज महाराज यांचे झालेले प्रथम दर्शन, दिलेला गुरुमंत्र, त्यांचे साजरे झालेले गुरुपौर्णिमा उत्सव आदींविषयीच्या आठवणी ग्रंथात दिल्या आहेत.
गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या अगम्य लीला आणि शिकवण (खंड २)
प्रस्तुत ग्रंथात प.पू. भक्तराज महाराज यांनी शिष्य डॉ. आठवले यांचे नामकरण न करता ‘डॉक्टर हे ‘डॉक्टर’ म्हणूनच ओळखले जातील’, असे सांगणे, प.पू. भक्तराज महाराज यांची लेखिकेने अनुभवलेली सर्वज्ञता, अनेक सिद्धि प्राप्त असतांनाही त्यांचा क्वचितच वापर करणारे प.पू. भक्तराज महाराज यांचे अविस्मरणीय प्रसंग, लीला, अनुपम प्रीती आणि अनमोल शिकवण इत्यादींविषयी माहिती दिली आहे. हे वाचून प.पू. बाबांचे व्यक्तीचित्र डोळ्यांसमोर उभे रहाते !
गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या अखेरच्या आजारपणात घडलेली त्यांची सेवा (खंड ३)
या ग्रंथात प.पू. भक्तराज महाराज यांचे बुद्धीअगम्य वागणे, प्रकृती अस्वास्थ्य आणि शेवटची भेट, प.पू. भक्तराज महाराज यांचे अंत्यदर्शन, अंत्ययात्रा आणि निर्वाणानंतरच्या वर्षभरातील घडामोडी, सनातन संस्थेचे मुख्य कार्यालय गोवा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय अन् गुरुकृपेने वाढत गेलेले संस्थेचे कार्य, इंदूर येथील आश्रमजीवन इत्यादींविषयी माहिती दिली आहे. या अनमोल आठवणी वाचून वाचकासमोर तो संपूर्ण इतिहास जिवंत उभा रहातो !
प.पू. रामानंद महाराज यांच्या सान्निध्यातील अनुभव आणि त्यांच्याविषयीच्या अनुभूती (खंड ४)
उच्च कोटीच्या संतांचा सहवास लाभलेल्या व्यक्तींना भाग्यवंत म्हणतात. लेखिका डॉ. (सौ.) कुंदा आठवले अशाच भाग्यवंतांपैकी एक असून त्यांना प.पू. भक्तराज महाराज त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज या गुरुद्वयींचा सहवास लाभला. या ग्रंथात लेखिकेने इंदूरच्या ‘भक्तवात्सल्याश्रम’ येथे अनुभवलेले आश्रमजीवन, प.पू. रामानंद महाराज यांचे सान्निध्य, त्यांची अपार प्रीती अन् देहत्याग इत्यादींविषयी ग्रंथात सांगितले आहे.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com |