प.पू. भक्‍तराज महाराज यांनी श्रीमती अंजली कुलकर्णी यांना काव्‍यातून मार्गदर्शन करणे !

१. प.पू. भक्‍तराज महाराज यांना विचारलेले प्रश्‍न

श्रीमती अंजली कुलकर्णी

‘एकदा मी सूक्ष्मातून रामनाथी आश्रमातील ध्‍यानमंदिरात गेले आणि प.पू. भक्‍तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्‍या चरणी भावपूर्ण नमस्‍कार केला. नंतर मी प.पू. भक्‍तराज महाराज यांना विचारले, ‘प.पू. बाबा, जीव जन्‍माला आल्‍यावर त्‍याच्‍याकडून कितीही चुका झाल्‍या, तरी देव त्‍याच्‍या कर्माकडे साक्षीभावाने कसा पहातो ?  त्‍याच्‍या कल्‍याणाचाच विचार कसा करतो आणि त्‍याची साधना कशी करून घेतो ?’

२. प.पू. भक्‍तराज महाराज यांनी दिलेले उत्तर !

जन्‍मा येऊनी आठव श्री गुरुचरण ।

प्रारब्‍ध भोगूनी होई नराचा नारायण ।
कर्मबंधनातून सुटका हीच असे खूण ॥
सन्‍मुख असे भगवंत करण्‍या मोक्ष प्रदान ।
जन्‍मा येऊनी आठव श्री गुरुचरण ॥ १॥

कृतज्ञता वाटण्‍या असे कष्‍टप्रद जीवन ।
मुमुक्षत्‍वे पाही हृदयगुरु, हीच त्‍याची खूण ।
संचित, प्रारब्‍ध जसे, तसेच क्रियमाण ।
जन्‍मा येऊनी आठव श्री गुरुचरण ॥ २॥

प.पू. भक्‍तराज महाराजांनी मला जे उत्तर सांगितले, ते ऐकून माझी पुष्‍कळ भावजागृती झाली आणि माझ्‍याकडून भावरूपी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

३. प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या चरणी व्‍यक्‍त केलेली काव्‍यपुष्‍परूपी कृतज्ञता !

शब्‍द हे दिले, तव कृपा असे निरंतर ।
भावजागृतीतून दिले, सदैव अनुसंधान ।
काही मागणे नको, दिले छत्ररूपी पांघरूण ।

अल्‍पबुद्धी मी, ठेवले श्री गुरुचरणी मन ।
जन्‍मा येऊनी आठवू दे, केवळ श्री गुरुचरण ॥

श्री गुरुचरणी कोटीश: कृतज्ञ!’

– श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (वय ७३ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक