शिष्य डॉ. आठवले यांना येत असलेली आनंदाची अनुभूती ही सर्वोच्च अनुभूती असल्याचे प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगणे
‘वर्ष १९९२ मध्ये शिष्य डॉ. आठवले आणि त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्यात पुढील संभाषण झाले.
शिष्य डॉ. आठवले : मी घेत असलेल्या सत्संगातील साधकांना विविध अनुभूती येतात. मला मात्र येत नाहीत. याचे कारण काय ?
प.पू. भक्तराज महाराज : तुम्हाला आनंद जाणवतो का ?
शिष्य डॉ. आठवले : हो, नेहमीच !
प.पू. भक्तराज महाराज : मग याच्या पुढची निराळी अनुभूती काय येणार ?’
– संकलक (वर्ष १९९२)