‘भारताला भविष्‍यकाळाची चिंता नाही’, अशा भ्रमात राहू नये !

‘भारतातील काही लोक आणि जगातील लोकशाही असलेल्‍या राष्‍ट्रांचे नेते यांच्‍याकडून प्रशंंसा केलेल्‍या भारतीय राज्‍यघटनेच्‍या भविष्‍याविषयी सध्‍या संशय व्‍यक्‍त केला जात आहे, तसेच भारताच्‍या भविष्‍याविषयी चिंता व्‍यक्‍त केली जात आहे; कारण देशातील आणि देशाबाहेरील काही गट भारतात फूट पाडून लोकशाहीला तडा देऊन देशाचे तुकडे करू पहात आहेत. प्रत्‍येक वेळी संधी मिळताच काँग्रेसच्‍या पदच्‍युत झालेल्‍या वंशजाकडून कायद्यानुसार निवडून आलेल्‍या केंद्र सरकारच्‍या विरोधात विदुषकाप्रमाणे नौटंकी (नाटक) केली जात आहे.

अधिवक्‍ता डॉ. एच्.डी. उपाध्‍याय

१. विरोधी पक्षांचे राज्‍यव्‍यवस्‍था उलथवून टाकण्‍याचे आणि देशाचे तुकडे करण्‍याचे ध्‍येय

प्रत्‍यक्षात ‘एखाद्याला पिसाळलेला कुत्रा संबोधून त्‍याला ठार करा’, असे धोरण असलेल्‍या ‘टूलकीट’चा  (एखादी विचारसरणी पुढे रेटण्‍यासाठी राबवण्‍यात आलेली योजना) तो भाग आहे. अनेक विरोधी पक्ष ज्‍यामधील काही पक्षांचे अस्‍तित्‍व नगण्‍य आहे, अशांचे एकत्र येण्‍यामागे ‘या ना त्‍या प्रकारे सध्‍याच्‍या राज्‍यव्‍यवस्‍थेला उलथवून टाकणे’, हेच एकमेव ध्‍येय आहे. जर त्‍यात ते यशस्‍वी झाले, तर भाजपच्‍या राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीच्‍या सरकारने जे काही केले ते पुसून टाकणे, हा त्‍यांचा हेतू आहे. कर्नाटकमध्‍ये काँग्रेसला आणि पंजाबमध्‍ये आम आदमी पक्षाला विजय मिळाल्‍यानंतर घडलेल्‍या घटनांचा क्रम पाहिला, तर वरील विधान निःसंशय सत्‍य आहे. बंगाल, केरळ आणि तमिळनाडू या राज्‍यांमध्‍ये फुटीरतावादी जिहादी गट मोठ्या शक्‍तीनिशी कार्यरत आहेत. ते आतंकवादाच्‍या जोरावर अराजकता निर्माण करून भारताचे तुकडे करण्‍याचे स्‍वप्‍न बागळून संधीची वाट पहात आहेत.

२. भारताची प्रसिद्धी ही राष्‍ट्रविरोधी शक्‍तींना त्‍यांची स्‍थिती दर्शवणारी !

दुसर्‍या बाजूने भारताचे पंतप्रधान रात्रीचा दिवस करून जागतिक स्‍तरावर भारताची शांततामय, जोशपूर्ण आणि जलद गतीने प्रगती करणारा देश अशी प्रतिमा निर्माण करण्‍याचा प्रयत्न करत आहेत. त्‍यांनी अलीकडेच अमेरिकेला दिलेली भेट आमच्‍या दृष्‍टीने अभिमानास्‍पद आहे. आपल्‍या पंतप्रधानांना जागतिक पातळीवरील नेत्‍याने दिलेला प्रतिसाद पहाता काही दुष्‍ट लोकांनी निर्माण केलेले ‘टूलकीट’ जगातील मोठी लोकशाही असलेल्‍या अमेरिकेने नाकारले आहे, हे स्‍पष्‍ट होते. प्रत्‍यक्षात भारताची प्रसिद्धी करणार्‍या या वादळाने अमेरिका आणि युरोप यांना झाकोळून टाकून राष्‍ट्रविरोधी शक्‍तींना धूळ चारली आहे. पंतप्रधान मोदी यांच्‍या अमेरिका भेटीच्‍या पार्श्‍वभूमीवर भारत आणि अमेरिका यांमधील उभयपक्षी संबंधांना मिळालेल्‍या जोरदार प्रतिसादामुळे इतर राष्‍ट्रांमध्‍ये भारताची प्रतिमा उंचावली आहे.

३. राष्‍ट्रविरोधी घटकांना ठेचून काढण्‍याची हीच वेळ योग्‍य !

त्‍यामुळे भारताच्‍या प्रगतीमधील अडथळे दूर करण्‍यासाठी सर्व राष्‍ट्रविरोधी, जिहादी, फुटीरतावादी आणि कट्टरतावादी घटकांना ठेचून काढण्‍याची हीच वेळ आहे आणि ते कठीण नाही. विरोधी पक्षांतील बहुतांश नेते हे त्‍यांच्‍या दुष्‍कृत्‍यांमुळे कायद्याच्‍या कचाट्यात सापडू शकतात. त्‍यांच्‍यावरील खटल्‍यांची सुनावणी प्रत्‍येक दिवसागणिक केली पाहिजे. जे न्‍यायालयात दोषी ठरतील, ते कारागृहात गेल्‍याने त्‍यांच्‍या राजकीय वर्तुळापासून दूर जातील आणि इतरांची शक्‍ती न्‍यून झाल्‍याने ते काही करू शकणार नाहीत. श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेत म्‍हटले आहे, ‘जे घडायचे आहे ते घडेल.’ जे लिव्‍हिंग्‍जटन आणि रे इव्‍हान यांनी लिहिलेल्‍या ‘क्‍यू सेरा सेरा’ या गाण्‍याच्‍या अर्थाप्रमाणे आपला वास्‍तववादी राहून भारताचा भविष्‍यकाळ ‘क्‍यू सेरा सेरा’ आहे, म्‍हणजेच उज्‍ज्‍वल आहे, अशा भ्रमात राहू नये.’

– अधिवक्‍ता डॉ. एच्.डी. उपाध्‍याय, भाग्‍यनगर, तेलंगाणा.