प.पू. भक्तराज महाराज यांच्या एका वचनाचा भावार्थ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानाद्वारे समजणे !
सर्व साधकांवर कृपादृष्टी असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘काही वर्षांपूर्वी माझे वडील (पू. पद्माकर होनप) हे सनातनचा एक ग्रंथ वाचत होते. त्यात प.पू. भक्तराज महाराज यांचे एक वचन होते. त्यांना त्याचा अर्थ स्पष्ट होत नव्हता. ही शंका त्यांनी मला संगणकीय धारिकेद्वारे परात्पर गुरु डॉक्टरांना विचारण्यास सांगितली. त्या वेळी ‘आता याचे परात्पर गुरु डॉक्टर काय उत्तर देतील ?’, अशी मला जिज्ञासा होती.
परात्पर गुरु डॉक्टरांनी ती संगणकीय धारिका वाचली आणि त्यावर त्यांनी त्या वचनाचा अर्थ सूक्ष्म ज्ञानाद्वारे मला शोधण्यास सांगितला. हे वाचून माझ्या मनात विचार आला, ‘प.पू. भक्तराज महाराज अत्युच्च आध्यात्मिक पातळीचे संत होते. त्यांचा वचनाचा भावार्थ मला शोधणे जमेल का ?’ त्यानंतर विचार आला, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून मला उत्तर शोधायला सांगणे’, हा त्यांचा आशीर्वादाच आहे. त्यानेच सर्वकाही होणार आहे.’ त्यानंतर काही क्षणांतच मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या त्या वचनाचा अर्थ सूक्ष्म ज्ञानाद्वारे प्राप्त झाला आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन करण्याचे आणि त्यांच्या आशीर्वादाचे महत्त्व किती आहे ?’, हे माझ्या लक्षात आले आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२३)
|