दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची ‘भ्रमणभाषवर बोलतांना ‘हरि ॐ’ म्‍हणावे !’, या चौकटीविषयी आलेली अनुभूती

२४.२.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये ‘सप्‍तर्षींच्‍या आज्ञेनुसार साधकांनी भ्रमणभाषवर बोलतांना ‘नमस्‍कार’ऐवजी ‘हरि ॐ’ असे म्‍हणून संभाषण चालू करावे !’, अशी चौकट आली होती. त्‍या संदर्भात मला आलेली अनुभूती येथे दिली आहे. 

श्री. दत्तात्रेय कुलकर्णी

१. दैनिकात चौकट येण्‍याआधी तो विचार मनात येऊन कृती होणे

ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये आम्‍ही २ – ३ दिवस इंदूर येथे जाऊन आलो. तेथून आल्‍यानंतर माझ्‍याकडून जाता-येता, उठता-बसता ‘हरि ॐ तत्‍सत् ।’, असा जयघोष होत आहे. त्‍यानंतर ‘अनंत कोटी ब्रह्मांड नायक’ हा सच्‍चिदानंद परब्रह्म प.पू. डॉक्‍टरांचा जयघोष दिवसांतून ५ – ६ वेळा मोठ्यांदा होत आहे. त्‍यामुळे सर्वत्र चैतन्‍य पसरून वातावरणात हलकेपणा जाणवतो. नकारात्‍मकता नाहीशी होत आहे. त्‍यानंतर २४.२.२०२३ या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये ‘भ्रमणभाषवर बोलतांना ‘नमस्‍कार’ऐवजी ‘हरि ॐ’ असे म्‍हणून संभाषण चालू करावे’, ही श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची चौकट प्रसिद्ध झाली. या चौकटीवरून मला ‘प.पू. गुरुदेवांनी माझ्‍या मनात आधीपासूनच हा विचार दिला’, याची अनुभूती आली.

२. व्‍यष्‍टी प्रयत्नांत वाढ होणे

अ. त्‍यानंतर माझा ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ हा नामजप दिवसभर आणि रात्रभर चालू असतो. कधी कधी तो मोठ्यांदा होत असतो. याबरोबरच छायाचित्रापुढे डोके टेकवून दंडवत घालतांना, प्रार्थना आणि कृतज्ञता व्‍यक्‍त करतांना भावजागृती होते. आत्‍मनिवेदन आणि क्षमायाचना केल्‍यामुळे दिवसभर आनंद जाणवतो.

आ. एक चूक प्रतिदिन ५ टप्‍प्‍यांत (चूक, स्‍वभावदोष, चुकीमुळे झालेले परिणाम, ती चूक पुन्‍हा होऊ नये, यासाठी उपाययोजना आणि प्रायश्‍चित्त घेणे) लिहिल्‍यामुळे चुकांचे चिंतन होऊन स्‍वभावदोषांची आणि ‘एका चुकीमागे किती दोष लपले आहेत ?’, याची तीव्रतेने जाणीव होते.

अशा अनेक अनुभूती गुरुमाऊली देत आहे. यासाठी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

श्री. दत्तात्रेय कुलकर्णी (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ७९ वर्षे), गावभाग, सांगली.  (२४.२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक