बंगालमधील आय.एस्.एफ्.चा आमदार नौशाद सिद्दिकी याच्यावर बलात्काराचा आरोप
कोलकाता – बंगालमधील ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’चे (आय.एस्.एफ्.चे) आमदार नौशाद सिद्दिकी याने लग्नाचे आमीष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी सिद्दिकी याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.
‘ऑफिस में गलत तरीके से रोका, निकाह का झाँसा दे किया सेक्स’: बंगाल के MLA पर केस, फुरफुरा शरीफ दरगाह के पीरजादा भी हैं नौशाद सिद्दीकी #WestBengal #MLA https://t.co/nzey5itSHe
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 6, 2023
पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले, ‘नौशाद सिद्दिकी याने मला सुमारे दीड वर्ष त्याच्या कार्यालयात चुकीच्या पद्धतीने रोखून ठेवले. त्यानंतर लग्नाचे आमीष दाखवून माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर त्याने माझ्यासोबत बराच काळ शारीरिक संबंध ठेवले; पण जेव्हा मी लग्नाचा विषय काढला, तेव्हा नौशाद सिद्दिकी याने विरोध केला. सिद्दिकी याने त्याच्या साथीदारांच्या साहाय्याने मला धमकावणे चालू केले.’ पीडित महिलेने तिच्या भावाच्या साहाय्याने न्यू टाऊन पोलीस ठाण्यात सिद्दिकीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले. (नुसते अन्वेषण करून न थांबता आरोपीला तात्काळ अटक करणे अपेक्षित आहे ! – संपादक) आमदार नौशाद सिद्दिकी याने ‘मी निर्दोष असून माझ्या विरोधात कट रचला आहे’, असे म्हटले आहे.