असीम शेखने हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून हिंदु मित्राशी लावला विवाह !
|
कर्णावती (गुजरात) – राज्यातील नवसारी जिल्ह्यातून लव्ह जिहादचे एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. यांतर्गत कुख्यात गुंड आणि विवाहित असीम शेख याने एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी विवाह करण्याचे आश्वासन देऊन तिची अश्लील छायाचित्रे काढली. कालांतराने तिच्या कुटुंबियांनी एका हिंदु मुलाशी तिचा विवाह ठरवल्यावर शेखने तिची छायाचित्रे त्या मुलाला पाठवून विवाह तोडला. यानंतर शेख याने त्याचा हिंदु मित्र रौनक पटेल याच्याशी बलपूर्वक विवाह लावून दिला.
दोस्त से शादी करा 5 साल तक हिंदू लड़की से रेप करता रहा माफिया निजाम शेख#Guajarat #NizamShiekh https://t.co/gZ57BBSmib
— Hindustan (@Live_Hindustan) July 5, 2023
विवाहानंतर शेख तिच्यावर बलात्कार करत असे. पीडितेने या प्रकरणी शेख आणि पटेल यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी लव्ह जिहादच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. राज्याचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे अन्वेषण करून असीम शेख याला मुंबई येथून अटक केली. रौनक पटेल फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. नवसारीचे पोलीस अधीक्षक ऋषिकेश उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार असीम शेख हा मद्याची तस्करी करतो. त्याच्या विरोधात तस्करीच्या संदर्भात ३१ गुन्हे नोंद असून अन्य काही प्रकरणांत ५ गुन्हे नोंद आहेत. (शेख याच्यावर याआधीच कठोर कारवाई केली गेली असती, तर तो लव्ह जिहादचे षड्यंत्र रचू शकला नसता ! सामाजिक असंवेदनशीलता बाळगणार्या गुजरात पोलिसांसाठी हे लज्जास्पद ! – संपादक)
पुलिस ने इस मामले में आरोपी को गिरफ्तार कर लिया है. #Gujarat https://t.co/wjGBKt1pvX
— AajTak (@aajtak) July 5, 2023
संपादकीय भूमिकाएका लव्ह जिहाद्याला हिंदु युवतीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास साहाय्य करणारा हिंदू हा हिंदु धर्माचा खरा वैरी ! लव्ह जिहाद्यांसह अशा हिंदूंनाही कठोर शिक्षा देणे आवश्यक ! |