हिंदु मुलीने धर्मांतर करून विवाहित अन् २ मुले असलेल्या मुसलमान व्यक्तीशी केला निकाह !

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचा प्रत्यक्ष अनुभव आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध

पुणे – बीड जिल्ह्यातील माहेश्‍वरी समाजातील निकिता लोहिया या हिंदु मुलीने ४७ वर्षीय विवाहित अन् २ मुले असलेल्या मुसलमान व्यक्तीशी निकाह केला. या मुलीने धर्मांतरही केले आहे. संबंधित हिंदु मुलगी बीड जिल्ह्यातील एका खेडेगावातून शिकण्यासाठी पुणे येथे आली होती. तेथेच ती एका मुसलमान व्यक्तीच्या प्रेमात पडली. याविषयी मुलीच्या आई-वडिलांना संशय आल्याने त्यांनी तिला घरी बोलावले आणि पुन्हा पाठवले नाही. यावर मुसलमान व्यक्तीच्या सांगण्यावरून तिने ‘मी स्वत:च्या इच्छेने मुसलमान धर्म स्वीकारला आहे’, या आशयाचा ‘व्हिडिओ’ सिद्ध करून प्रसारित केला.

१. संबंधित मुसलमान व्यक्तीने या व्हिडिओचा आधार घेत पुणे येथील न्यायालयात अर्ज करून तिला न्यायालयात उपस्थित करण्याचा आदेश मिळवला. त्यानंतर १ जुलै या दिवशी तिला न्यायालयात उपस्थित करण्यात आले.

२. ही घटना हिंदु अधिवक्त्यांना कळताच ८ हिंदु अधिवक्त्यांनी न्यायालयात हरकत नोंदवत युक्तीवाद केला; मात्र मुलगी सज्ञान असल्याने न्यायालयाने हरकतीला संमती न देता ‘मुलीला तिच्या मुसलमान पतीच्या घरी जायचे असल्यास जाऊ शकते’, असा आदेश दिला.

३. त्या वेळी मुलीचे आई-वडील पुष्कळ रडत होते; परंतु हिंदु मुलीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. ती त्या मुसलमान व्यक्तीसमवेत निघून गेली. या घटनेनंतर ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचा प्रत्यक्ष अनुभव पुणे येथील या घटनेतून आला असल्याची माहिती सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली.

संपादकीय भूमिका

  • यावरून हिंदु मुलींना धर्मशिक्षणाचा किती आवश्यकता आहे ?, हे लक्षात येते ! यासह समाजात लव्ह जिहादचा किती पगडा आहे  ?, हे ही लक्षात येते ! हे रोखण्यासाठी सरकारने कायदा करणे आवश्यक आहे !
  • ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करणार्‍यांना या घटनेविषयी काय म्हणायचे आहे ?