मी त्यागपत्र देणार ही अफवा ! – मुख्यमंत्री
मुंबई – मी त्यागपत्र देणार आहे, ही अफवा आहे. विरोधकांकडून ती पसरवली जात आहे. सर्वसामान्य घरातील माणूस मुख्यमंत्री झाला, ही विरोधकांची पोटदुखी आहे. सरकारच्या शपथविधीपासून ते ‘सरकार पडेल’ असे म्हणत आहेत. त्यांनी अफवांच्या मर्यादा पार केल्या आहेत. विरोधकांनी प्रथम त्यांची घरे सांभाळावीत, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले.
राजकीय नाट्य: CM शिंदे म्हणाले – राजीनाम्याच्या बातम्या अफवा आहेत, संजय राऊत म्हणाले होते- येत्या काही दिवसांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार#EknathShinde #SanjayRaut #MaharashtraPoliticalCrisis https://t.co/a1VeCLxmj7
— Divya Marathi (@MarathiDivya) July 6, 2023
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेत कुणीही अप्रसन्न नाही. आम्ही विकासासमवेत आहोत. अजित पवार यांनीही विकास पाहून सरकारला साथ दिली. आता आमचे सरकार मजबूत झाले आहे. मागच्या सरकारने बंद पाडलेले सर्व प्रकल्प आम्ही चालू केले. सर्वसामान्य माणसाला पुढे नेणे, हे आमचे ध्येय आहे.