टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील साईबाबा मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरली !
हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
श्रीरामपूर (नगर) – अज्ञात चोरट्याने टाकळीभान येथील श्री साईबाबा मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. ही घटना ३ जुलै या दिवशी घडली. ३ मासांपूर्वी याच मंदिराचा पितळेचा कळस चोरण्यात आला होता. त्याचे अन्वेषण चालू असतांनाच दानपेटी फोडण्याचा प्रकार घडला आहे. तालुका पोलिसांनी तातडीने चोरांचा शोध लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.