मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पीडित आदिवासीचे पाय धुतले !
आदिवासी व्यक्तीवर लघवी केल्याचे प्रकरण !
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील सिधी जिल्ह्यात प्रवेश शुक्ला या तरुणाने एका आदिवासी व्यक्तीवर लघवी केल्याचा व्हिडिओ सामजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या घरावर बुलडोजर फिरवून ते पाडण्यात आले.
#LIVE मुख्यमंत्री शिवराज ने पेशाब कांड पीड़ित आदिवासी के पैर धोए: हाथ पकड़कर CM हाउस ले गए, आरती उतारी और बोले- माफी मांगता हूं#MadhyaPradesh #ShivrajSinghChouhan https://t.co/vcEFPiye6u pic.twitter.com/5IKHsxYqZB
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 6, 2023
आता राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित आदिवासी व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना स्वतःच्या निवासस्थानी बोलावले. पीडित व्यक्तीला खुर्चीवर बसवून त्याचे पाय धुतले. त्याच्या कपाळावर टिळा लावून त्याला ओवाळले आणि शाल पांघरून त्याचा सत्कार केला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पीडित व्यक्तीला म्हणाले की, घडलेल्या घटनेमुळे मला दुःख झाले. मी तुमची क्षमा मागतो. तुमच्यासारखे लोक माझ्यासाठी देवाप्रमाणे आहेत.