मुलींच्या स्वच्छतागृहात ‘सी.सी.टी.व्ही. कॅमेरे’ लावलेल्या आणि ख्रिस्ती प्रार्थना म्हणून घेणार्या शाळेच्या प्राचार्यांना मारहाण !
तळेगाव (पुणे) येथील घटना !
पुणे – तळेगाव येथील मावळ तालुक्यातील अंबी गावातील ‘डी.वाय. पाटील स्कूल’मध्ये मुलींच्या स्वच्छतागृहात शालेय प्रशासनाने ‘सी.सी.टी.व्ही. कॅमेरे’ लावले असल्याचे उघडकीस आले. एवढेच नाही, तर विद्यार्थ्यांकडून ख्रिस्ती समाजाची प्रार्थनाही वदवून घेतली जायची. ही गोष्ट बजरंग दल आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना कळताच त्यांनी या शाळेच्या प्राचार्यांना जाब विचारला. त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी ४ जुलै या दिवशी प्राचार्यांना मारहाण केली.
‘अलेक्झांडर कोट्स’ असे या प्राचार्यांचे नाव आहे. हिंदुत्वानिष्ठ संघटनांनी या शाळेच्या प्राचार्यांवर विद्यार्थ्यांना बलपूर्वक ख्रिस्ती धर्माची शिकवण देण्याचा आरोप केला आहे. (हे आहे ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! हिंदूंंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणेही आवश्यक ! – संपादक) इतर शिक्षकांच्या साहाय्याने ते हे करत होते. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली आहे; पण या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नाही. प्राचार्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आले आहे.
कॅमेर्याच्या संदर्भातील प्रकार शाळेतील मुलींनी त्यांच्या पालकांना सांगितला. त्यावर पालकांनी शालेय प्रशासनाला जाब विचारला. त्या वेळी प्राचार्यांनी हे कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. शालेय प्रशासनाने या प्रकरणी मौन बाळगले आहे.
संपादकीय भूमिकाअसे प्रकार बहुतांश वेळा इंग्रजी शाळांमध्येच उघडकीस येतात. अशा शाळांमधील मुलांवर काय संस्कार होत असतील ? पालकांनो, अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही, ते ठरवा ! |