अशा लोकांवर कारवाई करा ! – मंदिर प्रशासनाचे पोलिसांना पत्र
केदारनाथ मंदिर परिसरात प्रेयसीकडून प्रियकराला विवाहाची मागणी घालणारा व्हिडिओ प्रसारित !
केदारनाथ (उत्तराखंड) – येथील पवित्र केदारनाथ मंदिराच्या परिसरात एका तरुणीने तिच्या प्रियकराला विवाहची मागणी घातल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. यावर लोकांनी टीका करत मंदिर परिसरात भ्रमणभाष संच नेण्यावर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे. याची गंभीर नोंद मंदिर प्रशासनाने घेतली असून अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
केदारनाथ धाम में रील्स बनाने वालों की खैर नहीं! लड़की ने बॉयफ्रेंड को किया था प्रपोज, बवाल के बाद एक्शन#kedarnathtemple #viralvideo #badrinath #kedarnath #uttarakhandhttps://t.co/IqoXHrrLRt
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) July 6, 2023
बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मंदिर परिसरात व्हिडिओ बनवणार्या लोकांवर बारीक लक्ष ठेवावे. अशा लोकांमुळे देश-विदेशातील भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने अशा घटना घडत आहेत, हे हिंदु संघटनांनी लक्षात घेऊन हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा ! |