मानवाधिकाराविषयी भारताला आम्ही सल्ले देऊ शकत नाही ! – अमेरिका
वॉशिंग्टन – प्रत्येक समाज आणि देश यांच्यासमोर काही अडचणी अन् आव्हाने असतात. यात आपलाही (अमेरिकेचाही) समावेश आहे. कुठलाच देश आदर्श नाही. सर्वांमध्ये काही ना काही उणिवा आहेत. अशात मानवाधिकाराविषयी भारताला आम्ही (अमेरिका) सल्ले देऊ शकत नाही, असे प्रतिपादन अमेरिकेचे हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राचे समन्वयक कर्ट कँपबेल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत केले. भारतातील मानवाधिकार आयोगाविषयी त्यांना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे विधान केले.
Don’t think US can or should lecture India any other country on democracy, human rights: Kurt Campbell
Read @ANI Story | https://t.co/OnCYBTz6el#India #US #KurtCampbell pic.twitter.com/f3P1hcqDFs
— ANI Digital (@ani_digital) July 6, 2023
कर्ट कँपबेल पुढे म्हणाले,
१. भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांत चीनचे सूत्र महत्त्वाचे आहे. तथापि दोन्ही देश या एकाच सूत्राचा विचार करत आहेत असे नाही, तर अन्यही अनेक सूत्रांवर दोघांनाही एकत्रित काम करायचे आहे.
२. रशिया-युक्रेन युद्धात भारताने सैद्धांतिक भूमिका स्वीकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमधील स्थिती आणि तेथील नागरिकांचे होणारे हाल यांविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या युद्धावरून भारत चिंतित असून रशियाची भूमिका निंदनीय असल्याचे त्याचे मत आहे.
संपादकीय भूमिका
|