कृतज्ञता व्यक्त का करावी ?
१. प्रत्येक क्षणी देव जे देतो, अनमोल विचार सुचवतो, त्याचे नाम आणि अनुसंधान यांची आठवण करून देतो अन् त्याच्या अस्तित्वाची अनुभूती देतो. त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी.
२. देव आपल्याला केवळ देतच असतो; पण आपल्याला ती जाणीवही नसते. ‘देवाने मला दिले आहे’, ही जाणीव सातत्याने माझ्या मनाला सतत रहावी, यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
– सौ. अनुश्री साळुंके (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.