परात्‍पर गुरु डॉक्‍टर कक्षातून बाहेर पडतांना इतरांना पाठ दिसणार नाही, याची काळजी घेतात !

परात्‍पर गुरु डॉक्‍टर काही वेळा साधकांना भेटण्‍यासाठी कक्षात येत. साधक, बालसाधक, संत किंवा नातेवाईक कुणीही असले, तरी भेटीनंतर त्‍यांच्‍या खोलीत जातांना ते साधकांशी बोलत बोलत बाहेर येत. बाहेर जातांना ‘ते कक्षात असलेल्‍यांना त्‍यांची पाठ दिसणार नाही’, याची काळजी घेत.

सौ. साक्षी जोशी

मला हे अतिशय वैशिष्‍ट्यपूर्ण आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर वाटले. ‘देवाने भक्‍तांना पाठ दाखवली’, असा विचार मनात आला, तरी ‘प्राण निघून गेल्‍यासारखे होईल’, असे मला वाटते. त्‍यामुळेच ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर पाठ न दाखवता जात असतील’, असे वाटले.

– सौ. साक्षी नागेश जोशी, फोंडा, गोवा. (२९.१०.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक