(म्हणे) ‘राष्ट्रप्रेमी नसलेल्यांसमवेत जाणार नाही !’ – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई – भाजपचे हिंदुत्व विघातक आणि मनुवादी आहे. भाजपचे हिंदुत्व माणसामाणसांमध्ये अंतर वाढवणारे आहे. कोल्हापूर, अकोला येथील दंगलीमागे कोण आहे, हे सर्व देशाला ठाऊक आहे. दंगल घडवून राजकीय लाभ घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय ऐक्याला तडा देणारे राष्ट्रप्रेमी असू शकत नाहीत. राष्ट्रप्रेमी नाहीत, त्यांच्यासमवेत जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेतली. शरद पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक ५ जुलै या दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. या बैठकीत शरद पवार यांनी वरील भूमिका मांडली.
वेळी शरद पवार म्हणाले, ‘‘आज काही लोकांनी बाजूला जाण्याची भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कष्टातून ते निवडून आले. ज्यांच्या कार्यकर्त्यांतून ते निवडून आले. त्यांचे मत न घेता वेगळी भूमिका घेणे हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. जे ज्यांच्या समवेत गेले आहेत, त्या भाजपने आंधप्रदेश, बिहार येथे मित्रपक्षांना संपवण्याचे काम केले. भाजपविषयी देशाच्या जनतेमध्ये अस्वस्थता आहे.’’
संपादकीय भूमिका :वर्ष २०१४ मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला स्वत:हून पाठिंबा देणार्या शरद पवार यांचे भाजपविषयी हास्यास्पद विधान ! |