शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी सोपा मार्ग दर्शवणारे सनातनचे ग्रंथ !
‘गुरुकृपा’ आणि ‘गुरुप्राप्ती’ शीघ्रतेने होण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ ! कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आदी साधनामार्गांचा सुरेख संगम असणारा, तो ‘गुरुकृपायोग’ ! गुरुकृपायोगानुसार साधनेविषयी सर्वांगाने दिशादर्शन करणारी सनातनची अनमोल ग्रंथमालिका !
गुरुकृपायोगानुसार साधना
कर्म, भक्ती आणि ज्ञान या योगमार्गांचा त्रिवेणी संगम असलेला ‘गुरुकृपायोग’ हा ईश्वरप्राप्तीचा सहज मार्ग आहे. प्रस्तूत ग्रंथात गुरुकृपायोगाचे महत्त्व, या योगमार्गामुळे इतर योगमार्गांच्या तुलनेत जलद होणारी आध्यात्मिक उन्नती, मृत्यूनंतरही जिवावर असणारी गुरुकृपा यांसारख्या विविधांगी विषयांवर मार्गदर्शन केले आहे.
गुरुकृपायोगाचे माहात्म्य
गुरुकृपेच्या माध्यमातून जिवाला ईश्वरप्राप्ती होणे, याला ‘गुरुकृपायोग’ म्हणतात. या ग्रंथात गुरुकृपायोगातील साधनेचे सिद्धांत, टप्पे आदींविषयी नाविन्यपूर्ण माहिती दिली आहे. तसेच गुरुकृपेसाठी व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा समन्वय साधून साधना कशी करावी, त्यासाठी आवश्यक गुण कोणते, यांचेही विवरण दिले आहे.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
अन्य प्रकाशन
आध्यात्मिक उन्नतीसाठी हठयोग (त्राटक आणि प्राणायाम)
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७