अधिक मासाच्‍या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्‍याहतपणे करणार्‍या सनातनच्‍या आश्रमांना अन्‍नदान करून पुण्‍यसंचयासह आध्‍यात्मिक लाभही मिळवा !

सर्वत्रच्‍या अर्पणदात्‍यांना अन्‍नदान करण्‍याची सुसंधी 

अन्नपूर्णादेवी

‘१८.७.२०२३ ते १६.८.२०२३ या काळात ‘अधिक मास’ (मलमास) आहे. या मासात नाम, सत्‍संग, सत्‍सेवा, त्‍याग, दान आदींना अधिक महत्त्व असते. या मासात दान केल्‍यास अधिक पटींनी फळ मिळते.

१. अन्‍नदानाचे अनन्‍यसाधारण महत्त्व !

‘अन्‍नदान करणे’, हे श्रेष्‍ठ कर्म मानले जाते. हिंदु धर्मशास्‍त्रानुसार जो गृहस्‍थ अर्थार्जन करतो आणि ज्‍याच्‍या घरी प्रतिदिन अन्‍न शिजते, त्‍याने अन्‍नदान करणे, हे त्‍याचे कर्तव्‍यच आहे. ‘सद़्‍भावनेने ‘सत्‍पात्रे अन्‍नदान’ केल्‍यास अन्‍नदात्‍याला त्‍याचे उचित फळ मिळते, तसेच सर्व पातकांतून त्‍याचा उद्धार होऊन तो ईश्‍वराच्‍या जवळ जातो’, असे धर्मशास्‍त्र सांगते. अन्‍नदान केल्‍यास अन्‍नदात्‍याला आध्‍यात्‍मिक स्‍तरावरही लाभ होतो.

२. धर्मप्रसाराचे कार्य अव्‍याहतपणे करणार्‍या सनातनच्‍या आश्रमांना अन्‍नदान करा !

सध्‍या धर्मग्‍लानीचा काळ असल्‍याने ‘धर्मप्रसार करणे’, हे काळानुसार आवश्‍यक कार्य आहे. ‘धर्मप्रसाराचे कार्य करणारे संत, संस्‍था वा संघटना यांना अन्‍नदान करणे’, हे सर्वश्रेष्‍ठ दान आहे. सनातन संस्‍था राष्‍ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध आहे. सनातन संस्‍थेचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमधून धर्मप्रसाराचे कार्य केले जाते. सध्‍याच्‍या काळात राष्‍ट्र आणि धर्म यांची सेवा करण्‍याचे महत्त्व लक्षात घेऊन शेकडो साधक आश्रमांत राहून पूर्णकालीन सेवा करत आहेत. धर्मजागृतीचे कार्य अव्‍याहतपणे करणार्‍या सनातनच्‍या आश्रमांना अन्‍नदानासाठी धनरूपात साहाय्‍य करण्‍याची संधी अर्पणदात्‍यांना आहे.

हिंदु संस्‍कृतीत सांगितलेले दानाचे महत्त्व !

भारतीय संस्‍कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्‍नदान, वस्‍त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्‍यबळाची प्राप्‍ती करून देते. ‘या पृथ्‍वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.

जे अर्पणदाते अधिक मासाच्‍या निमित्ताने साधकांसाठी अन्‍नदानाकरता धनरूपात साहाय्‍य करून धर्मकार्यात सहभागी होऊ इच्‍छितात, त्‍यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्‍यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com

टपालाचा पत्ता : सौ. भाग्‍यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

अन्‍नदानासाठी संस्‍थेला धनादेश द्यावयाचा असल्‍यास तो ‘सनातन संस्‍था’ या नावाने द्यावा.

https://www.sanatan.org/en/donate येथेही दान (अर्पण) करण्‍याची सुविधा उपलब्‍ध आहे.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्‍यवस्‍थापकीय विश्‍वस्‍त, सनातन संस्‍था. (२४.६.२०२३)