साधक अनुभवत असलेली भगवंताची प्रीती !
- भगवंता, तुझ्याविषयी काही सांगण्यास आम्ही पुष्कळ अज्ञानी आहोत रे…!
- स्वभावदोष आणि अहं यांचे गाठोडे घेऊन आम्ही वाटचाल करतो रे…!
- साधनामार्गावरून कसे चालायचे, हेही आम्हाला ठाऊक नाही रे…!
- गुरूंच्या कृपाछत्राखाली सुरक्षित असतांनाही प्रयत्नरूपी पाऊल अडखळते रे…!
- क्षणोक्षणी आमचा सांभाळ करत असूनही ते अनुभवण्यास न्यून पडतो रे…!
साधकांचे हे आत्मनिवेदनरूपी बोल ऐकून भगवंत कृपा करतो आणि साधकांचे बोट धरून त्याला मोक्षमार्गाकडे घेऊन जातो, अशा प्रीतीस्वरूप भगवंताच्या चरणी कृतज्ञता !