शिष्‍याचा गुरूंप्रती भाव !

gurupournima

१. ‘गुरुदेवा, आपले दर्शन झाले, माझे मनोरथ पूर्ण झाले. आपण आमच्‍याकरता या पृथ्‍वीवरील प्रत्‍यक्ष परमात्‍मा आहात. आपल्‍या चरणी अनंत प्रणाम !

२. गुरुदेवा, पावसाळ्‍यात ओढे, नाले निर्माण होतात. ते गंगातिराला मिळाले, तर ते पवित्र गंगानदीच होतात. तसे आपल्‍या चरणांचा आश्रय घेतल्‍याने आम्‍ही गंगाजलासारखे पवित्र झालो आहोत.

३. गुरुदेवा, मिठाचा खडा जोपर्ंयत सागराबाहेर असतो, तोपर्यंतच त्‍याचे निराळेपण असते. तो सागरात टाकला, तर विरघळून जातो. तसे आम्‍ही आपल्‍या स्‍वरूपाशी मिळून जाऊ, अशी कृपा करा !

(साप्‍ताहिक ‘सनातन चिंतन’, १९ जुलै २००७, अंक २५)