‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणाची शेवटची सिद्धता : अंतराळ यानाला जोडले रॉकेट !
बेंगळुरू (कर्नाटक) – ‘चंद्रयान-२’च्या अपयशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ चंद्रयान-३ या अंतराळ यानाचे यशस्वी उड्डाण आणि चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’साठी (यानाला कोणतीही हानी न पोचवता उतरवण्यासाठी) युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षांच्या अथक परिश्रमांचे फळ काय मिळते, याची केवळ इस्रोच्या वैज्ञानिकांनाच नव्हे, तर सर्व भारतीय नागरिकांना उत्कंठा लागली आहे. ‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणाची सिद्धता शेवटच्या टप्प्यात आहे.
#chandrayaan3: लॉन्च के लिए चंद्रयान-3 को रॉकेट में किया गया असेंबल, श्रीहरिकोटा के सतीश धवन स्पेस सेंटर में लॉन्चिंग की तैयारियां तेजी से चल रही हैं। इस मिशन को 12 से 19 जुलाई के बीच किया जाएगा लॉन्च
Source: ISRO#ISRO #chandrayaan #India #LatestNews #moneycontrol pic.twitter.com/MSLlMuKCJw
— Moneycontrol Hindi (@MoneycontrolH) July 5, 2023
श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन स्पेस सेंटर’ येथून ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण होणार असून ५ जुलै या दिवशी अंतराळात सोडणारे रॉकेट ‘एल्.व्ही.एम्. ३’ची त्याला जोडणी करण्यात आली.
या वेळी इस्रोच्या एका अधिकार्याने सांगितले की, १३ जुलै ते १९ जुलै या कालावधीत ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण केले जाईल. ‘१३ जुलैलाच प्रक्षेपण करण्याचा आमचा प्रयत्न असेल’, असेही या अधिकार्याने सांगितले.