‘बीबीसी’कडून फ्रान्समधील हिंसाचाराला अप्रत्यक्ष समर्थन देणारे वृत्त प्रकाशित !
फ्रान्समधील मार्सेलिस शहरातील एका मुसलमान युवकाची व्यथा सांगून मुसलमानांच्या हिंसाचाराला फ्रेंच राजकारणी उत्तरदायी असल्याचा निष्कर्ष !
लंडन (इंग्लंड) – ‘बीबीसी’ने फ्रान्समध्ये चालू असलेल्या हिंसाचाराला तेथील राजकारणी उत्तरदायी असल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे. ‘फ्रान्समधील दंगे : राजकारण्यांसाठी आम्ही कुणीच नाही !’ या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्तामध्ये फ्रान्समधील मार्सेलिस या शहरातील अमिने या १९ वर्षीय मुसलमान मुलाची व्यथा मांडण्यात आली आहे. या वृत्तामध्ये ‘मी हिंसाचाराचे समर्थन करत नाही; परंतु येथील तरुण वर्गाला मी समजू शकतो’, अशा प्रकारे अमिने याचे कथन प्रकाशित करण्यात आले आहे.
राजधानी पॅरिसमध्ये पोलिसांकडून नाहेल एम्. या अरब मुलाच्या झालेल्या हत्येनंतर संपूर्ण फ्रान्समध्ये हिंसाचार उसळला. मार्सेलिस या समुद्राला लागून असलेल्या शहरातही मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड यांच्या घटना घडल्या. या सर्वांवर बीबीसीने प्रकाश टाकला असून संबंधित वृत्तामध्ये अमिने पुढे म्हणतो की, या शहरामध्ये अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. गरीब (मुसलमान) तरुण वर्गाला शिक्षणाचे कोणतेही माध्यम राहिले नसून त्यांच्यासमोर केवळ अमली पदार्थांशी संबंधित व्यवसाय करण्याचा पर्याय शेष आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शहराला दोनदा भेट दिली असून त्यांनी आमच्यासाठी विविध योजनांची घोषणा केली; परंतु आमची व्यथा मात्र ऐकून घेतली नाही, असे अमिने या वृत्तात शेवटी म्हटले आहे. एकूणच या वृत्तात ‘फ्रेंच राजकारणीच मुसलमान तरुण वर्गाच्या असंतोषाला कारणीभूत असून त्यातूनच हे तरुण दंगली करत आहेत’, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
‘पत्रकारिता एकांगी नसावी’, हे खरे; परंतु त्याचा समतोल राखतांना हिंसाचाराचे समर्थन करणे, हे केव्हाही निषेधार्हच आहे. अर्थात् भारतातील धर्मांध मुसलमानांना नेहमीच पाठीशी घालणार्या बीबीसीकडून फ्रान्ससंदर्भात दुसरी कोणती अपेक्षा करणार ? |