आदिवासी व्यक्तीवर लघवी करणार्या प्रवेश शुक्ला याला अटक
बुलडोझरद्वारे शुक्ला याचे घर पाडणार !
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशमधील सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघवी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी प्रवेश शुक्ला याला अटक केली. या अश्लाघ्य घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कारवाईचा आदेश दिल्यावर शुक्ला याला अटक करण्यात आली. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्याचे घर बुलडोझरद्वारे पाडण्यात येणार आहे.
सीधी में पेशाब कांड: नरोत्तम मिश्रा का बड़ा बयान, आरोपी के अतिक्रमण पर बुलडोजर चलेगा#MPNews https://t.co/qnlhtVTgxz
— News24 (@news24tvchannel) July 5, 2023
संपादकीय भूमिकाअशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना कठोर शिक्षा केली पाहिजे ! |