कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर, गडहिंग्लज, मलकापूर येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी जिज्ञासू, भाविक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
हिंदु धर्मावर होणार्या विविध आघातांविरोधात ठोस कृती करणे आवश्यक ! – आनंदराव पवळ, प्रांत उपाध्यक्ष, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समिती
कोल्हापूर – यापूर्वी होऊन गेलेल्या अनेक संतांनी आध्यात्मिक प्रगती साध्य करण्यासाठी गुरु केले आहेत. त्यामुळे आपणही आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. आज हिंदु धर्मावर विविध आघात होत असून त्यासाठी आपण जागृत झाले पाहिजे आणि ठोस कृती करणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समिती’चे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ यांनी केले. ते सनातन संस्थेच्या वतीने इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, लकी बझार, राजारामपुरी येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.
कोल्हापूर शहर येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात उपस्थित संत, मान्यवर, जिज्ञासू, भाविक या महोत्सवासाठी ६०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.
या प्रसंगी सनातन संस्थेचे संत पू. सदाशिव(भाऊ) परब, तसेच पू. (डॉ.) श्रीमती शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्थित होती.
उपस्थित मान्वर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री. रघुनाथ टिपुगडे, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, श्री. नितीन काकडे, व्यापारी संघटनेचे श्री. संतोष लाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. नितीन वाडीकर
कोल्हापूर येथील गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी पटेल समाजाचे प्रसिद्ध व्यावसायिक श्री. हरीभाई पटेल सोहळ्यासाठी उपस्थित होते. सोहळ्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘आषाढ मासात आमच्या समाजाचा ‘सप्ताह’चा कार्यक्रम असतो. त्यात आम्ही ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, असे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणार असून त्यासाठी आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे वक्ते हवे आहेत. आता युवती आणि महिला यांच्यामध्ये जागृती होणे आवश्यक आहे.’’ |
श्री. किरण कुलकर्णी म्हणाले ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे कोल्हापूरमध्ये घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनाच्या दिवशीच जाणीवपूर्वक औरंगजेब आणि टीपू सुलतान यांचे स्टेट्स ठेवण्यात आले. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून उभा केला जाणारा पैसा हिंदूविरोधी कारवायांसाठी वापरण्यात येत आहे. यासाठी हिंदूंना सतत जागृत रहावे लागेल.
गडहिंग्लज येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात मार्गदर्शन करतांना श्री. अमोल कुलकर्णी आणि उपस्थित मान्यवर
उपस्थित मान्यवर – भाजप चंदगड विधानसभा विस्तारक श्री. संदीप नाथबुवा, ‘राज स्पोर्ट’चे राजू मोरे, शिक्षक श्री. अनिल पाटील
मलकापूर येथील नृसिंह मंदिर येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी १४० जिज्ञासू उपस्थित होते.
राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! – जयवंत भाटले, माजी नगराध्यक्ष, निपाणी
निपाणी (कर्नाटक) – सनातन संस्था गेल्या अनेक वर्षांपासून धर्मप्रसाराचे पुष्कळ मोठे कार्य करत आहे. सनातन संस्था विविध माध्यमांतून हिंदु समाजाला धर्माचरण शिकवत आहे, त्याचा हिंदूंनी लाभ घेतला पाहिजे. आज हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृतीवर अनेक आघात होत आहेत, तसेच आपल्या राष्ट्रावरही अनेक संकटे येत आहेत. त्यामुळे धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण करणे, हे प्रत्येक हिंदुचे कर्तव्य आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे मत निपाणीचे माजी नगराध्यक्ष श्री. जयवंत भाटले व्यक्त केले. ते निपाणी येथील महादेव मंदिर येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते. या महोत्सवासाठी ४२१ हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. जयवंत भाटले यांच्या हस्ते जत्राट येथील सौ. मनीषा हरदारे यांचा धर्मप्रसाराच्या कार्यात विशेष योगदान दिल्याविषयी सत्कार करण्यात आला.