बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सभेतील बाँबस्फोटात एका कार्यकर्त्याचा मृत्यू
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या उत्तर २४ परगणा येथे इम्रान हासन या तृणमूल काँग्रेसच्या १७ वर्षीय कार्यकर्त्याचा बाँबस्फोटात मृत्यू झाला. येथील एका सभेत हा स्फोट झाला. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसने माकप आणि इंडियन सेक्युलर फ्रंट या पक्षांवर आरोप केला आहे. यापूर्वी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात जियारूल मोल्ला या तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
बंगाल पंचायत चुनाव: बम अटैक में 17 साल के #TMC कार्यकर्ता की मौत, #CPIM और #ISF पर आरोपhttps://t.co/QJDVCieVy7
— AajTak (@aajtak) July 5, 2023
संपादकीय भूमिकाबंगालमधील ही स्थिती राष्ट्रपती राजवट अपरिहार्य करते ! |