अमेरिकेत ‘व्हाईट हाऊस’मध्ये मिळाला ‘कोकेन’ हा अमली पदार्थ !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये २ जुलैच्या रात्री पांढरी पावडर आढळल्याने खळबळ उडाली. यानंतर संपूर्ण ‘व्हाईट हाऊस’ बंद करून अन्वेषण करण्यात आले. प्राथमिक अन्वेषणात ती पावडर म्हणजे ‘कोकेन’ हा अमली पदार्थ असल्याचे समोर आले. या वेळी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित नव्हते.
कम नहीं हो रहीं जो बाइडेन की मुश्किलें; व्हाइट हाउस में कोकीन मिलने से हड़कंप, कराया गया खाली#joebiden #whitehouse #cocaine #cocaineinwhitehouse #america #worldnewshttps://t.co/FfF1UycMnZ
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) July 5, 2023
अमली पदार्थ व्हाईट हाऊसच्या ‘वेस्ट विंग’मध्ये मिळाले. येथे स्वत: राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असून ओव्हल कार्यालय, कॅबिनेट कक्ष, प्रसारमाध्यमांचा कक्ष, तसेच राष्ट्राध्यक्षांसह काम करणार्या कर्मचार्यांचे कार्यालय आहे.