पाकमधील ख्रिस्त्यांचा सूड उगवणार ! – आतंकवादी संघटनेची घोषणा
|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – स्विडनमध्ये न्यायालयाने अनुमती दिल्यानंतर सलवान मोमिका या इराकी वंशाच्या नागरिकाने राजधानी स्टॉकहोम येथे नुकतेच कुराण जाळले होते. त्यानंतर इस्लामी देशांनी या घटनेचा निषेध केला होता. आता पाकिस्तान सरकारकडूनही यास विरोध केला जातआहे. पाक सरकारने या संदर्भात संसदेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले असून ७ जुलै या दिवशी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. दुसरीकडे पाकमधील आतंकवादी संघटना ‘लष्कर-ए-झांगवी’ने या घटनेसाठी पाकमधील ख्रिस्त्यांचा सूड उगवण्याची घोषणा केली असून त्यांनी चर्चवर आक्रमण करण्याचीही धमकी दिली आहे. यानंतर पाकमधील ख्रिस्त्यांनी सरकारकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सरकारने अद्याप या धमकीवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आतंकवादी संघटना पाकिस्तानमध्ये शिया मुसलमानांच्या विरोधात कारवाया करते.
जुमे पर पूरे पाकिस्तान में होगा प्रदर्शन, PM का ऐलान: स्वीडन में कुरान जलाने का विरोध, ईसाइयों-चर्चों पर हमले की पहले ही धमकी दे चुका है आतंकी संगठन#Pakistan #ShahbazSharif #quranburninghttps://t.co/tbjqvguIyk
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 5, 2023
१. या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी नसीर रायसानी याने प्रसारित केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, पाकमध्ये एकही चर्च आणि ख्रिस्ती व्यक्ती सुरक्षित रहाणार नाही. स्विडनमध्ये कुराण जाळल्याचा सूड उगवण्यासाठी ख्रिस्त्यांना लक्ष्य करून आत्मघाती बाँबस्फोट घडवले जातील. स्विडनमध्ये कुराण जाळून ख्रिस्त्यांनी मुसलमानांना आव्हान दिले आहे. जर एखादा ख्रिस्ती अन्य देशांमध्ये कुराणाचा अवमान करत असेल, तर जिहादच्या मार्गावर चालणारी आमची संघटना पाकिस्तान ख्रिस्त्यांसाठी नरक बनवेल.
२. पाकिस्तान कॅथॉलिक बिशप कॉन्फरन्स’ या संघटनेचे अधिकारी नईम यूसुफ गिल यांनी म्हटले की, स्विडनमध्ये कुराणाच्या झालेल्या अवमानाचा मी निषेध करतो. धार्मिक अल्पसंख्यांक असणारे आम्ही शांतता आणि बंधूभाव यांद्वारे राहू इच्छितो. आम्ही नेहमीच बहुसंख्यांकांचे समर्थन केले आहे. आम्ही कायद्याचे उल्लंघन करण्याचा कधी विचारही करू शकत नाही. आतंकवादी संघटनेच्या धमकीविषयी सतर्क रहाण्याचे मी आवाहन करतो.
३. पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये अन्य एका ख्रिस्ती संघटनेचे महासंचालक खालिद राशिद असी यांनी पोलीस अधिकार्यांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले. फैसलाबादमध्ये ४ सहस्र ख्रिस्ती रहातात. वर्ष २०१९ मध्ये पाकच्या पंजाब प्रांतमध्ये कुराणाच्या अवमानानंतर ख्रिस्तीविरोधी दंगली झाल्या होत्या. त्यात १० ख्रिस्ती ठार झाले होते. ही दंगल लष्कर-ए-झांगवी याच संघटनेने केली होती.
संपादकीय भूमिकाकुठे कुराणाच्या अवमानाच्या विरोधात संघटित होणारे जगभरातील जागरूक मुसलमान, तर कुठे स्वतःच्या धर्मग्रंथांचा अनादर झाल्यावर त्याविषयी साधा शाब्दिक निषेधही न नोंदवणारे निद्रिस्त हिंदू ! |