वारजे (पुणे) पोलीस ठाण्यातील ३ निरीक्षकांसह ४ कर्मचारी निलंबित !
पुणे – येथील वारजे भागात वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली होती. तोडफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवून वारजे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ७ कर्मचार्यांना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये वारजे पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक (सध्या नेमणूक सायबर पोलीस ठाणे) डी.एस्.हाके, तत्कालीन पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, यांच्यासह अन्य ४ जणांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक हाके यांची सायबर पोलीस ठाण्यात आणि बागवे यांचे विशेष शाखेत नुकतेच स्थानांतर करण्यात आले होते.