आझाद हिद सेना
५ जुलै २०२३ या दिवशी ‘आझाद हिंद सेने’चा स्थापनादिन आहे. त्या निमित्ताने…
वर्ष १९४५ मध्ये दुसर्या महायुद्धात जर्मनी आणि जपान यांचा पराभव झाला, तेव्हा आझाद हिंद सेनेचे सैनिक पकडले गेले. त्यांच्यावर वर्ष १९४६ मध्ये खटला भरला गेला. तेव्हा ‘आझाद हिंद सेना’ अत्यंत लोकप्रिय झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र घराघरांत लावले गेले.
वर्ष १९४६ मध्ये ‘रॉयल इंडियन नेव्ही’ आणि ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’ यांनी बंड पुकारले. ब्रिटीश सरकारने केलेल्या गुप्त चौकशीत त्यांना कळले की, ब्रिटीश सरकारमधील बहुतांश भारतीय सैनिकांना ‘आझाद हिंद सेने’विषयी सहानुभूती आहे आणि त्यांच्याविरुद्ध चालू असलेल्या खटल्यांच्या ते विरुद्ध आहेत. इंग्रजांना जेव्हा कळले की, ज्या सैनिकांच्या आधारावर ते भारतावर राज्य करू पहात आहेत, तेच त्यांना आता साथ देणार नाहीत. तेव्हा ब्रिटिशांसमोर कोणताही पर्याय उरला नाही; म्हणून मग त्यांनी त्यांचे चंबुुगबाळे आवरण्याची सिद्धता केली.
या भारतीय आणि आझाद हिंद सेना यांच्या सैनिकांना आपण शतशः प्रणाम केला पाहिजे.’
– श्री. जितेंद्र जोशी (साभार : ‘अभय भारत’, १५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २००९)