सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त साधिकेला त्यांच्या चरणी समर्पित करण्यासाठी सुचलेली काव्यपुष्पे !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त त्यांना काय अर्पण करणार ? कारण माझ्याकडे माझे असे काहीच नाही. भावसुद्धा त्यांचा आहे. त्यांनी दिलेला हा भावच त्यांच्या चरणी आपोआप काव्य रूपातून समर्पित झाला. ब्रह्मोत्सवाच्या काही दिवस अगोदर मला रात्री नियमितपणे काही काव्ये आपोआप सुचायची. ती काव्ये गुरुदेवांच्या चरणी एक भावपुष्प; म्हणून समर्पित व्हायची. ती पुढे दिली आहेत.
सागराची असीमता, थिटी पडेल गुरूंच्या प्रेमापुढे ।
कृतज्ञता व्यक्त करण्या शब्द अल्प पडतील, वर्णन करण्या गुरूंच्या प्रेमापुढे ॥ १ ॥
अर्पण करण्या काय आहे मजकडे ।
श्वासाचे देणेसुद्धा मिळाले आहे, गुरूंच्या आधारामुळे ॥ २ ॥
– कु. रजनीगंधा कुर्हे (७.५.२०२३)
आपल्यातच सामावून घ्यावे, ही कळकळीची प्रार्थना पामराची ।
चरणी वहातो भक्तीसुमने, मनातील तुमच्या प्रतीच्या प्रीतीची ।
आरती ओवाळतो, अंतःकरणातील ज्योतीने ।
जी तेवत आहे, तुमच्या प्रतीच्या कृतज्ञतेची ॥ १ ॥
चरणी माथा टेकला, ज्यावर आहे कृपादृष्टी आपल्या प्रीतीची ।
आपणास काय अर्पावे, आपण तर आहात परब्रह्मस्वरूप ।
आपल्यातच सामावून घ्यावे, ही कळकळीची प्रार्थना आपल्या पामराची ॥ २ ॥
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |