कृतज्ञता सुमन अर्पितो तव चरणा ॥
गुरुपौर्णिमा हा दिन उगवला ।
कृतज्ञता सुमन अर्पितो तव चरणा ॥ १ ॥
भवतापातूनी आणिलेत मजला ।
जीवननौकेत आनंद बहरला ॥ २ ॥
दुष्कर्मे ती खेचती मजला ।
परि तव कृपेचा शीतल स्पर्श लाभला ॥ ३ ॥
तुम्ही चरणी घेताच मजला ।
सकळ श्रमांतूनी जीव निमाला ॥ ४ ॥
कृतज्ञतेने भिजवी चिंब मजला ।
ऐशी कृपा अमोल तुमची करुणाकरा ॥ ५ ॥
कृतज्ञतेचे पुष्प वहातो तव चरणी ।
कृतार्थ जाहले जीवन शरण येता तव चरणी ॥ ६ ॥
शब्द नसती व्यक्त करण्या कृतज्ञता ।
तोकडी माझी बुद्धी वर्णन तव कृपेचे करण्या ॥ ७ ॥
बोबडे बोल असती जे शब्द माझे ।
अर्पूनी घ्यावे तुम्हीच माऊली ॥ ८ ॥
केवळ स्मरण तव कृपेचे राहो ध्यानी ।
हीच आस आज मम मनी ॥ ९ ॥
नित्य तुमचे स्मरण नित्य तुमचा सहवास ।
नित्य तुमचे स्वरूप स्मरणी हेच एक लक्ष्य जीवनी ॥ १० ॥
॥ श्री गुरुचरणार्पणमस्तु ॥
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |