‘पबजी’ या भ्रमणभाषमधील खेळांद्वारे भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली पाकिस्तानी विवाहित महिला !
हिंदु तरुणाशी विवाह करण्यासाठी ४ मुलांसह भारतात आल्यावर पोलिसांनी घेतले कह्यात !
नोएडा (उत्तरप्रदेश) – सीमा हैदर या २७ वर्षीय पाकिस्तानच्या कराची शहरातील विवाहित महिला भारतातील उत्तरप्रदेशातील नोएडा येथील किरणा मालाच्या दुकानात काम करणार्या सचिन या २४ वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली. ‘पबजी’ या भ्रमणभाषवरील खेळांद्वारे या दोघांची ओळख होऊन त्याचे रूपांतर प्रेमात झाले. सचिनशी विवाह करण्यासाठी सीमा कराचीहून नोएडा येथे आली. येथून ते दोघे हरियाणातील बल्लभगड येथे जात असतांना पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
#Pakistan woman finds love in #India via #PUBG, sneaks in with 4 kids
Love knows no reason. Or, as Seema Haider has been saying, love is the reason, the only one. This May, the 27-year-old Pakistani woman set out from Karachi, her four children in tow. https://t.co/MocuROAnIS pic.twitter.com/0JCKsVo3Fz
— The Times Of India (@timesofindia) July 4, 2023
१. मे मासामध्ये सीमा हैदर कराचीहून विमानाने दुबई येथे आणि तेथून नेपाळची राजधानी काठमांडू येथे आली. तेथून बसद्वारे भारतात पोचली. नोएडा येथे सचिनसमवेत राहिल्यानंतर त्यांनी एका अधिवक्त्याशी संपर्क केला आणि विवाह करण्याविषयी त्यांना सांगितले. या अधिवक्त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी या दोघांना कह्यात घेतले.
२. सीमा हैदर हिचा पती सौदी अरेबियामध्ये काम करतो. तो तिला मारहाण करतो, असा तिने दावा केला. तिने नेपाळचा व्हिसा घेऊन भारतात पोचली होती. भारतात आल्यावर तिने ती हिंदु असल्याचे सांगितले. तिच्या समवेत ४ मुले असल्याने पोलिसांनी या काळात तिची चौकशी केली नाही. आता तिला कह्यात घेतल्यानंतर पाकिस्तानी दूतावासाला याची माहिती देण्यात आली असून पोलीस, आतंकवादविरोधी पथक आदी यंत्रणा तिची चौकशी करत आहेत.