‘७२ हूरें’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय चौहान यांना सामाजिक माध्यमांवरून जिवे मारण्याच्या धमक्या !
चित्रपट मुसलमानविरोधी ठरवत त्यावर टीका
(७२ हुरे ही इस्लामी संकल्पना असून त्यानुसार इस्लामचे काटेकोर पालन करणारे स्वर्गात गेल्यावर त्यांना ७२ सुंदर युवतींचा सहवास लाभतो.)
मुंबई – बहुप्रतिक्षित चित्रपट ‘७२ हूरें’ प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक संजय पूरणसिंह चौहान यांना सामाजिक माध्यमांवरून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हा चित्रपट मुंबईवरील आतंकवादी आक्रमणावर आधारित आहे. हा चित्रपट मुसलमानविरोधी ठरवत त्यावर टीका केली जात आहे. दिग्दर्शक संजय चौहान यांची अपरिमित हानी करण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘७२ हूरें’ चित्रपट ७ जुलै २०२३ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पवन मल्होत्रा आणि अमीर बशीर मुख्य भूमिकेत आहेत.
‘हिंदुओं में मुसलमानों का खौफ जरूरी’ : ’72 हूरें’ की रिलीज से पहले डायरेक्टर को कट्टरपंथी दे रहे गाली, माँ से रेप की धमकी#72Hoorainhttps://t.co/j7i0oRW9Xw
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 3, 2023
१. रशिद खान याने ‘तुमची वेळ आली आहे’ अशा शब्दांत संजय चौहान यांना धमकावले आहे.
२. सामाजिक माध्यमांचा वापर करणार्या आणखी एका धर्मांधाने संजय चौहान यांच्या आईवर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.
३. मुशर्रफ अहमद याने चौहान यांना ‘डुक्कर’ आणि ‘हिजडा’ (नपुंसक) म्हटले आहे.
४. काही धर्मांध मुसलमानांनी दिग्दर्शक संजय चौहान यांना शिवीगाळ करण्याच्या बहाण्याने हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आक्रमण केले आहे.
५. शबनम नावाच्या महिलेने ‘७२ हूरें’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय चौहान यांच्या मृत्यूसाठी प्रार्थना केली.
६. प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री सबीहा शेख हिने ‘७२ हूरें’ चित्रपटाच्या निर्मात्यांना मुसलमानविरोधी ठरवत त्यांच्यावर टीका केली.
संपादकीय भूमिकाअभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे अशा वेळी कुठल्या बिळात लपून बसतात ? |