इराणमध्ये वर्ष २०२३ च्या पहिल्या ६ मासांत ३५४ लोकांना फाशी !
लोकांमध्ये भय निर्माण करण्यासाठी आणि सरकारविरोधी आंदोलने रोखण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत फाशीच्या शिक्षेत ३६ टक्क्यांनी वाढ !
तेहरान (इराण) – इराणमध्ये गेल्या ६ मासांत ३५४ लोकांना फाशी देण्यात आली आहे. वर्ष २०२२ मधील पहिल्या ६ मासांत २६१ लोकांना फासावर लटकवण्यात आले होते, तर संपूर्ण वर्षामध्ये ही संख्या ५८२ होती. पहिल्या ६ मासांची तुलना केल्यास यंदाचा आकडा हा ३६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती नॉर्वे येथील ‘इराण ह्यूमन राइट्स’ नावाच्या संघटनेने दिली. संघटनेच्या मते विरोध प्रदर्शने थांबवण्यासाठी, तसेच लोकांमध्ये भय निर्माण करण्यासाठी फाशीच्या शिक्षेत वृद्धी करण्यात आली आहे.
Execution: यह इस्लामिक देश सालभर में दे चुका 354 लोगों को मौत की सजा, क्यों अपने नागरिकों को नहीं बख्शा, जानेंhttps://t.co/lLQBe4mdw1
— Amar Ujala (@AmarUjalaNews) July 4, 2023
गेल्या वर्षी हिजाब न घातल्यावरून अटक केलेल्या महसा इराणी या महिलेचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. यावरून गेल्या अनेक मासांपासून देशभरात सरकारविरोधी आंदोलने होत आहेत. ही आंदोलने रोखण्यासाठीच फाशीच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. खरेतर अमली पदार्थ विकण्याच्या आरोपांवरून संबंधितांना फाशी देण्यात आली आहे. यामध्ये २० टक्के लोक हे बलुची अल्पसंख्यांक आहेत.
‘इराण ह्यूमन राइट्स’च्या माहितीनुसार वर्ष २०२२ मध्ये दिलेल्या फाशी दिलेल्यांची संख्या ही वर्ष २०१५ नंतर सर्वाधिक होती. वर्ष २०२१ मध्ये ही संख्या अल्प, म्हणजे ३३३ एवढी होती.