हरियाणा सरकार ४५ ते ६० वयोगटातील अविवाहितांना देणार २ सहस्र ७५० रुपये निवृत्तीवेतन !
चंडीगड – हरियाणा सरकार राज्यातील ४५ ते ६० या वयोगटातील अविवाहितांना निवृत्तीवेतन देणार आहे. जनसंवाद कार्यक्रमामध्ये एका ६० वर्षीय अविवाहित वृद्धाच्या मागणीवरून मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख ८० सहस्रांपेक्षा अल्प असेल, त्यांनाच हे वेतन दिले जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने सिद्ध केलेल्या अहवालानुसार या योजनेचा १ लाख २५ सहस्र अविवाहितांना लाभ मिळणार आहे.
हरियाणा में कुंवारों की बल्ले-बल्ले, मनोहर लाल खट्टर सरकार देने जा रही पेंशन; जानिए- उम्र सीमा और राशि#haryana #MahoharLalKhattar #Pensionhttps://t.co/UfwDG77rvB
— Hindustan (@Live_Hindustan) July 4, 2023
हरियाणा सरकार एका मासात ही योजना लागू करण्याच्या सिद्धतेत आहे. योजना लागू झाल्यानंतर अशा प्रकारे वेतन देणोर हरियाणा हे देशातील पहिले राज्य असेल. या योजनेद्वारे अविवाहितांना प्रतिमास २ सहस्र ७५० रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे. सध्या राज्यात वृद्ध, विधवा आणि विकलांग यांना अशा प्रकारचे निवृत्तीवेतन दिले जाते. अविवाहितांसमवेतच गरीब विधुरांनाही निवृत्तीवेतन देण्याचा विचार सरकार करत आहे.