डावे पक्ष राजकीय लाभासाठी समान नागरी कायद्याला हिंदु-मुसलमान वादाचे स्वरूप देत आहेत ! – काँग्रेसचा आरोप

कन्नूर (केरळ) – डावे पक्ष राजकीय लाभासाठी समान नागरी कायद्याला हिंदु- आणि मुसलमान वादाचे स्वरूप देत आहेत, असा आरोप केरळमधील काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर केला. समान नागरी कायद्यासंदर्भात माकपने त्याचा प्रमुख सहकारी पक्ष ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ला दिलेल्या प्रस्तावावरून अप्रसन्न झाल्याने काँग्रेसने हा आरोप केला आहे. काँग्रेसने दावा केला, की डावे पक्ष भाजपप्रमाणेच समाजात फूट पाडून हा कायदा लागू करण्यासाठी जातीय तणाव निर्माण करून ध्रुवीकरणाचा मार्ग अवलंबत आहेत.

समान नागरी कायद्यावर चर्चा करण्यासाठी माकपचे राज्य सचिव एम.व्ही. गोविंदन् यांनी ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’सह इतर मुसलमान संघटनांशी संपर्क साधल्याच्या एका दिवसानंतर काँग्रेसने ही प्रतिक्रिया व्यक्त केली.