सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तान्यांचे आक्रमण !
मार्चमध्येही केले होते आक्रमण !
सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) – येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तानी समर्थकांनी आक्रमण करून आग लावली. ही माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मार्च २०२३ मध्येही खलिस्तान्यांनी याच दूतावासावर आक्रमण केले होते. आता पुन्हा यावर आक्रमण करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ARSON ATTEMPT AT SF INDIAN CONSULATE: #DiyaTV has verified with @CGISFO @NagenTV that a fire was set early Sunday morning between 1:30-2:30 am in the San Francisco Indian Consulate. The fire was suppressed quickly by the San Francisco Department, damage was limited and no… pic.twitter.com/bHXNPmqSVm
— Diya TV – 24/7 * Free * Local (@DiyaTV) July 3, 2023
The U.S. strongly condemns the reported vandalism and attempted arson against the Indian Consulate in San Francisco on Saturday. Vandalism or violence against diplomatic facilities or foreign diplomats in the U.S. is a criminal offense.
— Matthew Miller (@StateDeptSpox) July 3, 2023
याप्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले की, सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात तोडफोड आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा अमेरिका तीव्र निषेध करते. अमेरिकेत असलेल्या विदेशी दूतावासांची तोडफोड आणि हिंसाचार करणे, हा गुन्हा आहे. (अमेरिकेने तोंडाच्या वाफा दवडण्यापेक्षा संबंधित खलिस्तान्यांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून ते पुन्हा अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस करणार नाहीत ! – संपादक)
संपादकीय भूमिकाबलाढ्य अमेरिकेत भारतीय दूतावासावर परत परत आक्रमण केले जाते, हे अमेरिकेला लज्जास्पद ! भारताने भारतीय संपत्तीच्या रक्षणासाठी अमेरिकेवर दबाव आणणे आवश्यक आहे ! |