भक्‍तीयोगाची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये आणि अन्‍य योगमार्गियांच्‍या तुलनेत भक्‍तीमार्गाने साधना केल्‍यामुळे संतपद प्राप्‍त करणार्‍यांची संख्‍या अधिक असण्‍यामागील कारणे !

‘अध्‍यात्‍मात ज्ञानयोग, ध्‍यानयोग, कर्मयोग, हठयोग, शक्‍तीपातयोग, नामसंकीर्तनयोग आणि भक्‍तीयोग असे विविध योगमार्ग आहेत. विविध योगमार्गांनुसार साधना करण्‍यासाठी आवश्‍यक असणारे गुण आणि त्‍यांच्‍यामुळे विकसित होणारे गुण पुढीलप्रमाणे आहेत.

१. विविध योगमार्गांचे आध्‍यात्मिक महत्त्व !

२. विविध योगमार्गांचा कर्मावर होणारा परिणाम : ज्ञानयोगामुळे परिपूर्णता, ध्‍यानयोगामुळे कर्मात एकाग्रता आणि अचूकता, कर्मयोगामुळे चिकाटी आणि कृतीशीलता अन् भक्‍तीयोगामुळे भावपूर्णता.

३. भक्‍तीयोगाचे आध्‍यात्मिक महत्त्व : ‘भक्‍तीच्‍या माध्‍यमातून भगवंताशी अनुसंधान साधणे’, हे भक्‍तीयोगाचे वैशिष्‍ट्य आहे. भक्‍तीयोगी संतांमध्‍ये भगवंताविषयी भाव आणि भक्‍ती, सेवावृत्ती, त्‍याग, प्रीती, परेच्‍छेने वागणे, अहं अल्‍प असणे इत्‍यादी गुणवैशिष्‍ट्ये प्रकर्षाने आढळतात. या गुणवैशिष्‍ट्यांचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

४. अन्‍य योगमार्गियांच्‍या तुलनेत भक्‍तीमार्गी जिवाची आध्‍यात्मिक उन्‍नती लवकर होऊन त्‍याला लवकर संतपद प्राप्‍त होण्‍यामागील विविध कारणे !

४ अ. विविध प्रकारचे लय, संबंधित सूक्ष्म देह आणि सूक्ष्म कोश अन् लय होण्‍याची प्रक्रिया किती टक्‍के पातळीला आरंभ होते ?

टीप – वरील कोष्‍टकातून हे सुस्‍पष्‍ट होते की, अन्‍य योगमार्गांच्‍या तुलनेत भक्‍तीमार्गाने साधना केल्‍यामुळे जिवाचा मनोलय, बुद्धीलय, अहंलय आणि चित्तलय तुलनात्‍मकरित्‍या लवकर होतो. त्‍यामुळे अन्‍य योगमार्गियांच्‍या तुलनेत भक्‍तीमार्गी जिवाची आध्‍यात्मिक उन्‍नती लवकर होऊन तो लवकर संतपद प्राप्‍त करतो, उदा. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्‍तराज महाराज यांनी त्‍यांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश यांची सेवा इतकी भावपूर्णरित्‍या केली की, त्‍यांना ९ फेब्रुवारी १९५६ या दिवशी त्‍यांची गुरुभेट झाल्‍यानंतर त्‍यांना १५ फेब्रुवारी १९५६ या दिवशी गुरुमंत्र मिळाला आणि १६ फेब्रुवारी १९५६ या दिवशी प.पू. अनंतानंद साईश यांनी त्‍यांचे नामकरण ‘भक्‍तराज’ असे केल्‍यामुळे ते संतपदी विराजमान झाले.

कु. मधुरा भोसले

४ अ. मनातील भावाच्‍या सूक्ष्म केंद्राचे महत्त्व : भावाचे केंद्र अनाहतचक्राच्‍या ठिकाणी असते. देहातील अनाहतचक्र हे मनाशी संबंधित आहे. त्‍यामुळे जेव्‍हा भावजागृती होते, तेव्‍हा मनामध्‍ये भगवंताशी थेट अनुसंधान साधले जाते. तेव्‍हा भगवंताप्रतीच्‍या प्रीतीमय आपतत्त्वाने भारित झालेल्‍या भावाच्‍या चैतन्‍यलहरी संपूर्ण मनात पसरून मनाची शुद्धी होऊन मनातील रज-तम प्रधान घटक न्‍यून होऊन मन सात्त्विक होण्‍यास साहाय्‍य होते. त्‍यामुळे जेव्‍हा भावजागृती होते, तेव्‍हा व्‍यक्‍तीच्‍या मनाची शुद्धीकरणाची प्रक्रिया चालू होते. अशा प्रकारे जेव्‍हा मनातील भावाचे सूक्ष्म केंद्र दृढ होते, तेव्‍हा बाह्य मन, बुद्धी, अहं आणि चित्त (सूक्ष्म मन) यांची शुद्धी होते. त्‍यामुळे मनोलय, बुद्धीलय, अहंलय आणि चित्तलय यांच्‍या लयाची प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन व्‍यक्‍तीचा संपूर्ण पिंड किंवा लिंगदेह अन्‍य योगमार्गांच्‍या तुलनात्‍मकरित्‍या लवकर शुद्ध होतो. अशा भक्‍तीमार्गी जिवाच्‍या शुद्ध अंत:करणात भगवंताचा नित्‍य वास असतो.

४ आ. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेले भावातील विविध घटक आणि त्‍यांचे प्रमाण

टीप – प्रार्थना, कृतज्ञता, सेवा आणि प्रीती हे घटक कृतीच्‍या स्‍तरावरील आहेत, तर आनंद आणि शांती हे परिणामस्‍वरूप आहेत. इतर घटकांमध्‍ये अष्‍टसात्‍विक भाव, म्‍हणजे १. स्‍वेद (घाम), २. स्‍तंभ (कुंठित होणे, थांबणे, थक्‍क होणे), ३. रोमांच, ४. स्‍वरभंग (स्‍वर गदगदणे), ५. कंप, ६. वैवर्ण्‍य (वर्ण, रंग पालटणे), ७. अश्रू आणि ८. मूर्च्‍छा यांचा समावेश आहे.

(क्रमशः रविवारच्‍या अंकात)

(संदर्भ – सनातनचा ग्रंथ : ‘भाव आणि भावाचे प्रकार’.) – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.