जळगाव येथे धर्मांतराचा डाव उधळला !
सतर्क आणि तत्पर असणार्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
जळगाव, ३ जुलै (वार्ता.) – शहरातील अजिंठा रोडवरील मंगलम लॉन्स येथे ग्रामीण भागातील लोकांसाठी ख्रिस्ती मिशनर्यांनी सत्संगाचे आयोजन केले होते. त्या वेळी ‘आमच्या देवाची प्रार्थना केली, तर सर्व आजार बरे होतात. तुम्हाला दुसर्या कोणत्याही देवाची भक्ती करायची आवश्यकता नाही’, असे सांगून ग्रामीण भागातील लोकांचा धर्मपरिवर्तन करण्याचा डाव ख्रिस्ती मिशनर्यांनी साधला. विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सनदशीर मार्गाने पोलिसांचे साहाय्य घेऊन धर्मांतराचा डाव उधळून लावला. या प्रकरणी कीर्तनकार योगेश कोळी यांच्या तक्रारीनुसार आरोपी सीमा संतोष पाटील, पवन सारसर, राजकुमार यादव, प्रदीप भालेराव यांच्यावर रात्री विलंबापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते.