राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून मुंबई आणि पुणे येथे ५ ठिकाणी धाडी !
एक मुसलमान कह्यात !
मुंबई – आतंकवादी कारवायांच्या संशयावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून मुंबई आणि पुणे येथे ५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. इसिसच्या संपर्कात असलेल्या नागपाडा येथील रहिवाशाविरुद्ध २८ जून या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला होता. याच प्रकरणी संशय आणखी बळावल्याने वरील धाडी टाकण्यात आल्या. मुंबई आणि भिवंडी येथे प्रत्येकी दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी धाड टाकण्यात आली. पथकाने कोंढव्यात धाड टाकल्यावर जुबेर शेख (वय ३९ वर्षे) याला कह्यात घेण्यात आले आहे.