सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे दिला पदभार !
छत्रपती संभाजीनगर – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी निवृत्ती घोषित केल्यानंतर ३ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे पदभार दिला. या वेळी त्याच्यासमवेत सर्व अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी मासाभरापूर्वी केलेल्या अर्जाला अपर मुख्य सचिवांनी मान्यता दिली होती.