‘राष्ट्रवादी काँग्रेस’ नाव आणि ‘घड्याळ’ पक्षचिन्ह आमचेच ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
मुंबई – जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निलंबित करण्याचा कोणताही अधिकार नाही. ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ हे पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह ‘घड्याळ’ हे आमचेच आहे. जे आमदार माझ्यासमवेत आहेत त्यांचे भविष्य चांगले राहील, याचे दायित्व आमच्याकडे आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही अधिक बळकट करणार आहोत, असे वक्तव्य अजित पवार यांनी ३ जुलै या दिवशी मुंबईतील पत्रकार परिषदेत केले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण असेल ?’ असे पत्रकारांनी विचारले असता ‘राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच आहेत’, असे अजित पवार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अमोल मिटकरी आदी नेते उपस्थित होते.
#BreakingNews: Ajit Pawar claims support of 40 NCP MLAs while briefing media
Ajit Pawar: Party, party symbol belongs to us. I have full support of NCP MLAs. We will take the party to new heights
Translation by @poonam_burde, listen in#SharadPawar #AjitPawar #MaharastraPolitics pic.twitter.com/3TIL5wJKvy
— News18 (@CNNnews18) July 3, 2023