फ्रान्स जात्यात, तर भारत सुपात !
फ्रान्ससारखी स्थिती भारतात येऊ द्यायची नसेल, तर भारताला हिंदु राष्ट्र बनवा !
गेल्या ५ दिवसांपासून आश्रित धर्मांध मुसलमान फ्रान्सला जाळत आहेत आणि फ्रान्स त्याकडे अगतिकतेने पहाण्यापलीकडे काही करू शकत नाही. अण्वस्त्रधारी फ्रान्स अल्पसंख्यांक मुसलमानांपुढे हतबल झाल्याचे संपूर्ण जग पहात आहे. फ्रान्समधील ही स्थिती पुढे आणखी किती दिवस रहाणार आहे ? हे अद्यापही सांगता येणार नाही; कारण या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जी इच्छाशक्ती आणि कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे ती गेल्या ५ दिवसांत होतांना दिसलेली नाही. ५ व्या दिवशी धर्मांधांनी पॅरिसच्या उपनगराच्या महापौरांच्या निवासस्थानी ज्वालाग्रही पदार्थांनी भरलेली पेटती चारचाकी धडकवली. ‘त्याद्वारे महापौरांची हत्या करण्याचा त्यांचा प्रयत्न होता’, असे पोलिसांनी म्हटले आहे. यावरून स्थिती किती गंभीर आहेत, हे लक्षात येते. गेल्या ५ दिवसांत असंख्य वाहने, घरे, दुकाने जाळण्यात आली आणि लुटण्यात आली. या लुटमारीमध्ये मुसलमान महिलाही आघाडीवर होत्या. पॅरिसमधील सर्वांत मोठे ग्रंथालय जाळण्यात आले. फ्रान्सच्या पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यावरून नाहेल एम्. या १७ वर्षीय मुसलमान तरुणाला रोखले; मात्र तो पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा रोखण्यात आल्यावर तो जुमानत नसल्याचे पाहून पोलिसांनी त्याला गोळ्या झाडून ठार केले. यानंतर फ्रान्समध्ये मुसलमानांकडून हिंसाचार चालू झाला. फ्रान्स सरकार म्हणत आहे, ‘हा हिंसाचार धार्मिक नाही, तर लोकांचा उद्रेक आहे.’ नाहेल हा आफ्रिका खंडातून विस्थापित झालेल्या मुसलमानांपैकी एक होता. त्यामुळे विस्थापित मुसलमानांनी नाहेल याच्या हत्येचा राग म्हणून हिंसाचार चालू केला आहे. त्यामुळे फ्रान्स सरकार ‘हा धार्मिक कारणातून होत असलेला हिंसाचार नाही’, असे म्हणत असले, तरी हिंसाचार करणारे ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देत हिंसाचार करत आहेत, ते का ? याचे उत्तर कुणाकडे नाही. संपूर्ण युरोपमध्ये सर्वाधिक म्हणजे १० टक्के मुसलमान फ्रान्समध्ये आहेत आणि त्यांची संख्या प्रतिवर्षी वाढत आहे. काही मासांपूर्वी जागतिक फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये फ्रान्सने मोरोक्को या आफ्रिका खंडातील मुसलमान देशाला पराजित केल्यावर फ्रान्समध्ये असलेल्या मोरोक्कोच्या शरणार्थी मुसलमानांनी प्रचंड हिंसाचार केला होता आणि तोही काही दिवस चालू होता. यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली. याचा अर्थ फ्रान्समध्ये रहाणारे विस्थापित आश्रित मुसलमान फ्रान्सविषयी देशभक्ती दाखवण्याऐवजी आणि कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी फ्रान्सचाच गळा कापण्याचा प्रयत्न करत आहेत, हेच यातून लक्षात येते.
भारताला हिंदु राष्ट्र करणे आवश्यक !
फ्रान्समधील पोलिसांनी चूक केल्याने ही स्थिती उद़्भवली आहे, हे सत्य असले, तरी ‘त्या चुकीमुळे होणारा हिंसाचार योग्य आहे’, असे म्हणता येणार नाही. फ्रान्स पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने गोळ्या झाडल्या, तसे जगभरात कोणतेही पोलीस करत नाहीत आणि करू शकत नाहीत. त्यामुळे फ्रान्सच्या संबधित पोलिसांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे; मात्र त्याच वेळी ‘आश्रित मुसलमान फ्रान्समधील नियमांची सतत पायमल्ली करत असतात का ?’, याचीही माहिती जगासमोर आली पाहिजे. फ्रान्समधील मुसलमान जिहादी कारवाया करत असल्याने २ वर्षांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी कठोर कायदा आणून जिहाद्यांना साहाय्य करणार्या मशिदींना टाळे ठोकणे चालू केले आहे. म्हणजेच ‘फ्रान्समध्ये काय चालू आहे’, हे लक्षात येते. आश्रित मुसलमानांची समस्या संपूर्ण युरोपला मोठ्या प्रमाणात भेडसावू लागली आहे आणि ती पुढे कोणते रूप घेणार आहे, हे फ्रान्समधील घटनेतून युरोपमधील देशांना लक्षात येत आहे, हे सांगायला नको. ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड्स, स्विडन हे अन्य काही युरोपीय देश आहेत जेथे अशाच समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातही पोलंडसारख्या देशाने शहाणपणा दाखवत मध्य-पूर्वेतून येणार्या विस्थापित मुसलमानांना त्यांच्या देशात प्रवेश देण्याचे नाकारले. त्यामुळे आज पोलंड शांत आहे आणि त्याच्या या निर्णयाचे युरोपमधील नागरिक कौतुक करू लागले आहेत. मानवतेच्या दृष्टीने संकटग्रस्तांना साहाय्य करणे, हे योग्य असले, तरी संकटग्रस्तांची मानसिकता कशा प्रकारची आहे ? ते पुढे आपल्याच देशाला संकटात तर टाकणार नाहीत ना ? याचाही त्याच वेळी अभ्यास करणे किती आवश्यक ठरते, हे युरोपमधील सध्याच्या स्थितीवरून लक्षात येते. मुसलमानांच्या लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे सर्वाधिक असते, त्यामुळे भविष्यात काही वर्षांत युरोपमध्ये मुसलमानांची लोकसंख्या वाढली, तर आज ख्रिस्ती असणारे देश इस्लामी देश झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. काही देशात तर ख्रिस्त्यांची संख्या अल्प होत असल्याने हा धोका अनेक तज्ञांनीही व्यक्त केला आहे. फ्रान्स आणि एकूणच युरोपची स्थिती पहाता भारतातही पुढे असे घडू शकते, हे नाकारता येणार नाही. भारतात २० कोटी मुसलमान आहेत, असे सांगितले जाते. फ्रान्समध्ये केवळ १० टक्के म्हणजे जवळपास ६० लाख मुसलमान आहेत. भारतात बांगलादेशी घुसखोर मुसलमानही कोट्यवधी आहेत, तर रोहिंग्या मुसलमानांचीही संख्या वाढत आहे. हे लोक गुन्हेगारीत आणि जिहादी आतंकवादी कारवायांत सहभागी असल्याचे उघड झाले आहे. काश्मीरमधून हिंदूंना बहुसंख्य मुसलमानांनी हाकलून लावले. देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झालेले आहेत. समजा फ्रान्सप्रमाणे एखादी घटना घडली आणि त्याचा परिणाम संपूर्ण देशात धर्मांधांकडून हिंसाचार करण्यात झाला, तर भारताचे काय होईल ? अशा धर्मांधांना पाकचाच नाही, तर आखाती देशांचाही छुपा पाठिंबा मिळेल. कारण भारताला इस्लामी देश करणे, हा त्यांचा उद्देश राहिलेलाच आहे. अशा वेळी भारताची स्थिती काय असेल ? हे सांगता येत नाही. यामुळे आताच वेळ आहे की, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करून त्याचा लगाम धर्माभिमानी शासनकर्त्यांच्या हातात ठेवावा.