अजित पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट !
मुंबई –उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३ जुलै या दिवशी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे उपस्थित होते. या भेटीत महायुतीच्या पुढच्या धोरणाविषयी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.