अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांची हकालपट्टी !
मुंबई – भाजप-शिवसेना यांना पाठिंबा देणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील पुढील निर्णय सुनील तटकरे घेतील, अशी घोषणाही प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेच्या गटनेतेपदी अजित पवार, तर पक्षप्रतोद आमदार अनिल पाटील यांची नियुक्ती केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी ३ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षपदी सौ. रूपाली चाकणकर यांची नियुक्ती घोषित केली.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या. त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांना अपात्र करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. pic.twitter.com/KFb1vfInNB
— SakalMedia (@SakalMediaNews) July 3, 2023
जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरवण्यात यावे, असे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.