बंगालमध्ये भाजपच्या पदाधिकार्याची हत्या
पुरुलिया (बंगाल) – येथे बंकिम हंसदा या ४८ वर्षीय भाजपच्या पदाधिकार्याचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बंकिम हे केंदडी गावातील एका मतदान केंद्राचे भाजपचे सरचिटणीस होते. ‘पंचायत निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसकडून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात येत आहेत’, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाबंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! |